About O Shruti's Book - Katha Eka Pratyavarthanachi
The book ‘Katha Eka Pratyavarthanachi (Mi Islam ka sweekarla va sanathan dharmath ka paratle)’ was launched on 14th July 2024, at Lady Ramabai Hall, Pune.
This book is the Marathi translation of the original book in Malayalam titled ‘Oru Paravarthanathinte Katha’ authored by O Sruthi, the first woman Pracharika of Aarsha Vidya Samajam.
The book was released by Honourable Member of Parliament, Rajya Sabha, Dr Smt Medha Kulkarni ji by presenting it to prominent social worker and author, Padmashri Girish Prabhune ji.
Aacharyasri KR Manoj ji, Founder & Director of Aarsha Vidya Samajam presided over the function. In his speech, Acharya ji emphasized on the major brainwashing strategies affecting our people and society, how it needs to be countered, and the solution that AVS offers.
The chief guests Dr Medha Kulkarni ji, Padmashri Girish Prabhune ji, Sri Utham Kumar ji (Convenor, Kerala Cell, Maharashtra & Chairman of Prateeksha Foundation), and Smt Shefali Vaidya ji addressed the gathering.
The anchoring was done by Sri Dayanand Bandgar ji. Sri Anand Raichur ji (Bajrang Dal worker from Karnataka) delivered the welcome address, and Smt Madhura Inamdar Thite (Dharma Jagran, Parvati Jila Sah Samyojika) the Vote of Thanks.
The book, which was jointly translated to Marathi by Sri AR Nair ji and Sri JA Thergaonkar ji, was introduced by Vishali Shetty (Full time Pracharika, Aarsha Vidya Samajam).
O Sruthi, the author, spoke about the book and her experience and the need to spread awareness about religious conversions and bring back people to the right path of Sanathana Dharma.
Sisters Anagha, Anusha, Amritha spoke about their experience of conversion to Islam that affected Anagha and how it impacted her and the entire family.
Cultural song and dance performances made the event more colourful.
The book launch event was organized by Aarsha Vidya Samajam in association with Bouddhikam Books and Publications, Har Ghar Savarkar Trust Pune, Mrityunjay Prakashan, Sakal Hindu Samaj.
Shefali Vaidya ji Review About the Book
#Shefali_Vaidya @shefvaidya
श्रुती ते रहमत व परत – प्रवास एका प्रत्यावर्तनाचा
काल पुण्यात एका आगळ्यावेगळ्या पुस्तकाच्या मराठी अनुवादाचे प्रकाशन झाले. ओ. श्रुती नावाची केरळमधील कासरगोड येथील हव्यक ब्राह्मण कुटुंबातली एक हिंदू मुलगी काही वर्षांपूर्वी इस्लामी प्रोपागंडाला बळी पडून मुसलमान झाली व श्रुतीची रहमत बनली. परंतु, काही काळानंतर आर्ष विद्या समाजम ह्या हिंदू संघटनेचे आचार्य श्री मनोज ह्यांच्या मार्गदर्शनाखाली तिने पुन्हा स्वखुशीने स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला. श्रुती ते रहमत ते परत श्रुती हा तिचा प्रवास कसा घडला ह्याबद्दल तिने एक छोटे पुस्तक लिहिलेले आहे. ‘ओरू परावर्तनतींटे कथा’ ह्या शीर्षकाचे हे आत्मचरित्रपर पुस्तक श्रुतीने तिची मातृभाषा मल्याळममध्ये लिहून २०१८ मध्ये केरळमध्ये प्रथम प्रकाशित केले होते. केरळमध्ये हे पुस्तक प्रचंड लोकप्रियही झाले होते परंतु दुर्दैवाने मल्याळम मध्ये असल्यामुळे केरळच्या बाहेर फारसे कोणाला या पुस्तकाबद्दल फारशी माहिती नव्हती. पण नंतर ‘स्टोरी ऑफ अ रिव्हर्शन’ या नावाने ह्या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद प्रसिद्ध झाला आणि काल राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी आणि पदमश्री गिरीश प्रभुणे ह्यांच्या हस्ते ‘कथा एका प्रत्यावर्तनाची’ ह्या नावाने हे पुस्तक काल मराठी भाषेतही प्रसिद्ध झाले.
साध्या-सोप्या भाषेत लिहिल्या गेलेल्या ह्या पुस्तकातून इस्लामी मतप्रसाराबद्दलच्या अनेक गोष्टी उघड होतात, अनेक मिथकांना छेद देणारे असे हे पुस्तक आहे. ‘जातिभेदाला आणि गरिबीला कंटाळून हिंदू लोक मुसलमान होतात’ असा एक तथाकथित पुरोगाम्यांचा लाडका सिद्धांत आहे. पण ते खरे नाही. इस्लाम ही एक प्रिडेटरी विचारसरणी आहे जी सतत भक्ष्याच्या शोधात असते. गरीब, श्रीमंत, स्त्री, पुरुष, खालची-वरची जात ह्यातला कोणीही हिंदू कधीही इस्लामी विचारसरणीची शिकार होऊ शकतो कारण सर्वसामान्य हिंदू व्यक्तीला आपल्या धर्माची, त्यातल्या तत्वांची इतकी कमी माहिती असते की तो किंवा ती स्वतःला डिफेंड करू शकत नाही आणि अब्राहमीक विचारसरणीबद्दलचे आपले अज्ञान इतके अगाध असते की आपण त्यांच्या विचारसरणीवर मुद्देसूदपणे हल्ला करू शकत नाही.
आपल्या घरांमधून, शाळांमधून, धार्मिक संस्थांमधून सुद्धा आपण आपल्या मुलांना हिंदू धर्माबद्दल शास्त्रशुद्ध ज्ञान देतच नाही. त्यामुळे तरुणांच्या मनात गोंधळ निर्माण होतो. मिशनरी आणि इस्लामिस्ट बरोबर ह्याच वैचारिक गोंधळाचा फायदा घेतला आणि त्यांच्या मते ‘काफिर’ असलेल्या व्यक्तींना इस्लाम स्वीकारायला प्रवृत्त करतात. श्रुतीचे नेमके तेच झाले. एकीकडे तिच्या कुटुंबात तिला ’सर्व धर्म सारखे’ ही शिकवण दिली गेली पण त्याचबरोबर स्वतःच्या धर्माबद्दल नीटसे काहीच सांगितले गेले नाही. दुसरीकडे ती शिक्षणासाठी घरापासून दूर राहताना बरोबरीच्या मुसलमान मैत्रिणी आणि त्यांचे कुटुंबीय ह्यांनी ठरवून विचारपूर्वक इस्लामबद्दल सतत इतकी सकारात्मक माहिती दिली की स्वतःच्या हिंदू असण्याबद्दल आधीच संभ्रमित असलेली श्रुती तिच्याही नकळत इस्लामच्या प्रभावाखाली आली. विशेष म्हणजे कोणा मुसलमान मुलाच्या प्रेमात पडून श्रुती इस्लामकडे आकर्षित झाली नाही तर स्वधर्माबद्दलचे अज्ञान आणि इस्लामबद्दलचे सतत देण्यात येणारे, वरवर तार्किक वाटणारे ज्ञान ह्या दोन गोष्टींचा एकत्रित प्रभाव तिच्यावर पडून ती मुसलमान झाली. हा सर्व प्रवास तिने प्रांजळपणे ह्या पुस्तकात मांडला आहे.
तिसरी गोष्ट म्हणजे, इस्लामचा योजनाबद्ध रीतीने प्रसार-प्रचार करण्यासाठी विविध भारतीय भाषांमधून मोठ्या प्रमाणात लिखित, ऑडिओ-व्हिज्युअल क्लिप्स, पुस्तके वगैरे साहित्य सहज उपलब्ध जे इस्लामची फक्त चांगली बाजूच मांडते. एकदा एखाद्या हिंदू व्यक्तीने इस्लाम स्वीकारला की मगच इस्लामचे कठोर वास्तव त्यांच्या समोर येते. पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. अनेकदा असे अनेक हिंदू जे चुकीच्या समजुतीमुळे किंवा समजुतीच्या अभावामुळे इस्लाम धर्म स्वीकारतात, ते पुन्हा त्यांच्या हिंदू धर्मात परतू इच्छितात परंतु त्यांना योग्य वेळेला योग्य ते सहाय्य करणारी सुनियोजित सपोर्ट सिस्टम हिंदूंमध्ये अजून म्हणावी तशी मोठ्या प्रमाणावर सर्वत्र उपलब्ध नाही. श्रुतीच्या सुदैवाने तिला योग्य वेळी आर्ष विद्या समाजम ही संस्था सापडली आणि तिचे प्रत्यावर्तन यशस्वी झाले.
आपल्या भाषणात श्रुती काल म्हणाली’ हिंदू म्हणून जन्मले असूनही मला माझ्या धर्माच्या विश्वास, विधी किंवा दैवी संकल्पनांमध्ये कोणतीही निष्ठा नव्हती. मला मिळालेले इतिहासाचे ज्ञान शाळेत शिकलेल्या गोष्टींपुरतेच मर्यादित होते. माझ्या इस्लामिक मित्रांनी मला त्यांचा इतिहास शिकवला. त्यांनी मला इस्लामिक तत्त्वज्ञान तर शिकवलेच पण माझ्या धर्मावर टीका करताना त्यांना मी जेव्हा ऐकले, तेव्हा टीका करताना देखील त्यांना माझ्या धर्माबद्दल माझ्यापेक्षा किती अधिक माहिती होते हे पाहून मी थक्क झाले.’
सततच्या ब्रेनवॉशिंगमुळे श्रुती मंदिरे, मूर्तिपूजा आणि हिंदू रीतिरिवाज ह्यांच्यापासून हळूहळू दूर जाऊ लागली, ज्यामध्ये तिच्या मुस्लिम मित्र-मैत्रिणींनी दिलेले मूर्तीपूजेविरुद्धचे प्रचार साहित्य महत्त्वाचे ठरले. त्याचबरोबर इस्लाम हा कसा सर्व बाबतीत श्रेष्ठ आहे हेही तिच्या मनावर बिंबवले जात होतेच. ह्या द्विधा मनस्थितीत असताना श्रुती तिच्या घरी कासरगोडला गेली की तिचे आपल्या आई-वडिलांशी खटके उडत. त्यांना पूजा करताना बघितले की श्रुतीला त्यांची चीड येई. एकांतात ती नमाज पढत असे. मानसिक दृष्ट्या तिचे मतांतर पूर्ण झाले होते तरी तिला ब्रेनवॉश करणारे लोक खुश नव्हते. त्यांनी श्रुतीला औपचारिक रित्या मुसलमान व्हायचा सल्ला दिला.
ऑक्टोबर २०१३ मध्ये श्रुती तिचे घर सोडून मल्लपुरम येथे गेली आणि मौनथुल इस्लाम सभा येथे औपचारिकपणे इस्लाम स्वीकारला. तो विधीही अगदीच सोपा आणि सुटसुटीत होता असे ती म्हणते, ‘एका बाईने माझ्या डोक्यावर तीन वेळा पाणी ओतले आणि मला काही अरबी श्लोक तिच्या पाठोपाठ म्हणायला लावले आणि मी मुसलमान झाले. मी रहमत हे नाव स्वीकारले. मी माझ्या पालकांनी दिलेले श्रुती हे नाव, ज्याचा अर्थ वेद आहे ते नाकारले’. पुढे ती म्हणते की त्या संस्थेत धर्मांतरासाठी आलेल्या ६५ महिला होत्या. त्यात वृद्ध महिला, पूर्ण गर्भवती महिला, १६-१७ वर्षांच्या मुली, आणि दोन मुली असलेली महिला अशा सर्व महिलांचा समावेश होता आणि सर्व हिंदू होत्या. त्यांच्यापैकी फार कमी स्त्रिया श्रुतीसारख्या इस्लाम पटला म्हणून आल्या होत्या. बाकीच्यांना काही आर्थिक प्रलोभन तरी दिले गेले होते किंवा त्यांच्या मुस्लिम पतींनी किंवा प्रियकरांनी त्यांना इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी भाग पाडले होते.
तिच्या आईवडिलांना जेव्हा हे समजले तेव्हा त्यांनी पोलिसात तक्रार केली. श्रुतीला न्यायालयाच्या आदेशानुसार कासारगोडमध्ये परत आणले गेले, तेव्हा तिला मौनथुल इस्लामवाल्या लोकांनी तिच्या नव्या विचारांवर ठाम राहायचा सल्ला दिला. आई-वडील आजारी पडले तरी, त्यांनी जीव द्यायची धमकी दिली तरी त्यांचे ऐकू नको असे तिला सांगितले गेले. श्रुतीच्या सुदैवाने काही हिंदू संघटनांच्या मदतीने तिला आर्य विद्या समाजम ह्या संस्थेत पाठवले गेले जिथे आचार्य मनोज ह्या तिथल्या गुरूंनी तिच्या सर्व प्रश्नांना उत्तरे देऊन, तिच्याशी तार्किकपणे वाद घालून तिला हिंदू धर्माची थोरवी पटवून दिली. इस्लामचा स्त्रीसंबंधी दृष्टिकोन काय आहे हेही तिला पुरावे देऊन पटवले गेले. हे सर्व डिबेट आणि पुरावे तिने ह्या पुस्तकात दिलेले आहेत.
रहमत बनलेली श्रुती परत एकवार श्रुती बनून स्वगृही तर परतलीच त्याबरोबरच ती एव्हीएसची पहिली पूर्णवेळ महिला कार्यकर्ती बनली. आज तिच्यासारख्याच ब्रेनवॉशिंगला बळी पडून इस्लाम आणि ख्रिश्चन बनलेल्या हजारो हिंदू मुलींना त्यांच्या मूळ धर्मात परत आणण्याच्या कामाला तिने स्वतःला वाहून घेतलेले आहे. श्रुतीचे हे पुस्तक म्हणजे केवळ घटनांचे वर्णन नाही तर हिंदू धर्मातील अध्यात्म आणि इस्लामी कट्टरतावादाबद्दलच्या मुद्द्यांचा सखोल अभ्यास आहे. एका बैठकीत सहज वाचून होणारे हे पुस्तक वाचकांना अनेक धक्के देते. स्वधर्माविषयी जागरूक सर्व हिंदूंनी नुसते वाचावेच नाही तर पाच कॉपी विकत घेऊन इतरांना भेट म्हणून द्यावे इतके मोलाचे हे पुस्तक आहे. पुस्तक विकत घेण्याची लिंक पहिल्या कॉमेंटमध्ये देत आहे.
शेफाली वैद्य
कथा एका प्रत्यावर्तनाची - दयानंद बंडगर (Dayanand Bandgar)
एका ब्राह्मण कुटुंबात जन्मलेली भगवान शंकराची भक्त जी पुढे इस्लामच्या मार्गावर जाते आणि आर्ष विद्या समाज च्या माध्यमातून पुन्हा हिंदू धर्माकडे वळते आणि आपलं संपूर्ण आयुष्य हिंदू धर्माच्या प्रचारासाठी प्रसारासाठी वाहून घेते अशा एका केरळ मधील मुलीची ही कथा आहे.
आज हिंदू समाजामध्ये असलेल्या धर्मशिक्षणाच्या अभावामुळे आपल्याला काय काय परिणाम भोगावे लागणार आहेत आणि भविष्यात हिंदू वर काय संकटे येणार आहेत याची कल्पना देण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे. एखाद्या मुस्लिम मुलाला किंवा मुलीला अगदी लहान वयात इस्लामचे धडे दिले जातात पण हिंदू कुटुंबांमध्ये सर्वात जास्त भर हा शालेय शिक्षणावर दिला जातो. त्याचाच परिणाम हिंदू समाजामध्ये आपल्या धर्माबद्दल आस्था नाही आणि सर्वात जास्त हिंदू लोक सर्वधर्मसमभाव या अंधश्रद्धेला बळी पडताना आपल्याला दिसतात.
तसाच काहीसा प्रकार लेखिकेच्या बाबतीत घडलेला आहे. लहानपणापासून सगळे धर्म सारखेच असतात असं त्यांच्या वडिलांकडून ऐकायला मिळालं पण लेखिकेने इयत्ता सातवी मध्ये असताना तिच्या एका शिक्षिकेच्या घरी जेवण केलं होतं ते लेखिकेच्या वडिलांना ज्या दिवशी समजलं त्यावेळेस ते लेखिकेवर खूप ओरडले. त्याचं कारण असं की त्या शिक्षिका खालच्या जातीतल्या होत्या. लेकीच्या वडिलांनी तिला संत टाकीत दिली की आपल्यापेक्षा खालच्या जातीच्या लोकांमध्ये जेवायचं नाही. पण त्यांच्याकडून सर्वधर्मसमभावाबद्दल लेखिकेला ऐकायला मिळालं होतं. पुढे शालेय जीवनात जास्तीत जास्त मैत्रिणी मुस्लिम असल्या कारणाने तिला इस्लाम बद्दल अधिक ची माहिती होत गेली तसतसं लेखिकेला इस्लाम बद्दल आपुलकी वाटू लागली. अल्लाह खुश करण्यासाठी ती दररोज नमाज पठण करायला लागली.
भगवान शंकराची निस्सीम भक्त ते नमाज पठण करणारी स्त्री असा प्रवास लिखकेचा झाला. लेखिका ज्या शाळेत शिकवत होती त्या शाळेमधील एका विद्यार्थ्याने लेखिकेला सांगितलं की तुम्ही इस्लाम स्वीकारला तर मी तुम्हाला 7 लाख रुपये मिळवून देऊ शकतो.
हिंदूंमधील धर्मशिक्षणाच्या अभावामुळे हिंदूंना धर्माविषयी प्रेम आपुलकी वाटत नाही इतकच नाही तर इतर हिंदूंविषयी सुद्धा आपल्यामध्ये प्रेमभाव आणि जिव्हाळ्याची कमतरता दिसून येते.
लेखिकेला तिच्या मैत्रिणींकडून ऑनलाईन माध्यमातून इस्लाम विषयी खूप सारे शिकायला मिळालं पण हिंदू धर्माविषयी सखोल आणि व्यवस्थित ज्ञान देणारा तिला कोणी भेटलं नाही. त्यामुळे तिचा प्रवास इस्लामकडे जास्त वेगाने होऊ लागला. आर्ष विद्या समाजम् च्या माध्यमातून लेखिकेला इस्लाम च्या वाटेवरून पुन्हा हिंदू धर्मामध्ये आणण्यात यश मिळालं. तिने भगवान शंकराची केलेली उपासना फळाला आली आणि ती पुन्हा हिंदू धर्माभिमानी म्हणून जगू लागली.
इस्लाम बद्दल आपल्याला खूप तोकडी आणि अर्धवट अशी बाजू सांगितली जाते. ज्यामधून इस्लाम हा खूप चांगला पंथ आहे अल्लाह कृपाळू दयाळू आहे असा आपला गैरसमज होतो. या ग्रंथामध्ये इस्लामच्या सर्व बाजूंना समजावून सांगितले आहे यामधून आपल्याला इस्लामची दाहकता लक्षात येते. पुढील काळात आपल्याला हिंदूंची होणारी धर्मांतर ही बघायची असतील तर आपल्याला लहान मुलांपासून सर्वांना धर्मशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. आर्ष विद्या समाज यासाठी केरळमध्ये काम करत आहे. ज्या चुका लेखीकेकडून झाल्या किंवा तिच्या पालकांकडून झाल्या त्या चुका पुन्हा होऊ नयेत आणि अशी पुस्तके आपल्याला पुन्हा प्रकाशित करायची वेळ येऊ नये यासाठी हे पुस्तक सर्वांनी वाचलं पाहिजे आणि आपल्या धर्माचा अभ्यास करून धर्माचं पालन आपण सर्वांनी करायला हवं.
दयानंद बंडगर (Dayanand Bandgar)
-भाजपा अभियंता सेल सोशल मीडिया सहप्रमुख महाराष्ट्र (BJP Engineering Cell Social Media SahPramukh, Maharashtra)
-संपर्कप्रमुख स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंच केडगाव (Sampark Pramukh, Swatantrayaveer Savarkar Yuva Vichar Manch, Kedgaon)
-सदस्य DACYP सोलापूर (Member DACYP Solapur)
प्रांजळ अनुभव कथन कथा एका प्रत्यावर्तनाची!
Nagesh Shewalkar, Pune
धर्मांतर आणि पुन्हा स्वधर्मात परतणे ही बाब तशी पुरातण आहे. वेळोवेळी अशा घटना घडल्याची इतिहासात नोंद आहे. परधर्मात गेलेल्यांना पुन्हा स्वधर्मात आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचेही कार्य अविरत सुरू आहे.
जिहाद, लव जिहाद आणि धर्मांतर या घटनांविषयी वेळोवेळी चर्चा होत असतात त्याचा कितपत उपयोग होतो हा वेगळा विषय होऊ शकतो परंतु जेव्हा एखादी व्यक्ती स्वधर्म-परधर्म असा प्रवास करुन पुन्हा स्वधर्मात परतते आणि तो प्रवास बारीकसारीक तपशीलांसह विस्तृत, सप्रमाण पुस्तक स्वरुपात जनतेसमोर ठेवते तेव्हा त्यात व्यक्त झालेल्या भावनांचा, अनुभवांचा वाचकांनी जरुर विचार करून ते सकारात्मक विचार समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत तरच या घटनांवर अंकुश बसु शकतो. ज्या कुणी व्यक्ती धर्मांतराचा विचार करत असतील, परंतु द्विधा मनःस्थितीत असतील त्यांच्यापर्यंत असे स्वानुभव पोहोचले तर निश्चितपणे थोडा तरी बदल घडू शकतो.
हे सारे लिहिण्यामागे ‘कथा एका प्रत्यावर्तनाची’ हे श्रुती भट्ट ह्यांचे प्रामाणिक अनुभव असलेले कथनात्मक पुस्तक वाचण्यात आले आणि या घटनांशी संदर्भात अनेक शंकांची उत्तरे मिळाली. एखाद्या घटनेवर चर्वितचर्वण होणे वेगळे, तिथे जिवंत अनुभव नसतात त्या घटनेशी संबंधित वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जाते आणि ते व्यक्त होताना दिसतात परंतु, स्वानुभवातून जे विचार, लेखन व्यक्त होते त्याला सत्यांशाचा स्पर्श झालेला असतो. ते विचार, ते लेखन कल्पनेचा आधार न घेता वास्तवाचे खरेखुरे चित्र उभे करते. तसं पाहिलं तर हे स्वानुभव श्रुतीचे आहेत परंतु हे लेखन धर्म बदल करणाऱ्या हजारो महिलांचे आहेत. हे नमूद करताना श्रुती लिहितात, ‘धर्मांतराचा प्रवास करुन स्वधर्मात आलेल्या स्त्रिया स्वतःच्या दाहक अनुभवांची चर्चा कुठेही करीत नाहीत.’ मग श्रुतीने हे लेखन का करावे? या प्रश्नाचे उत्तर देताना त्या म्हणतात, ‘आपल्याला आलेले वाईट अनुभव इतर कोणाच्या वाट्याला येऊ नयेत असा मी निर्धार केला. काही गैरसमजामुळे धर्मांतर झालेल्या तसेच धर्मांतराच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या लोकांना माझ्या आयुष्याचा दाखला देऊन त्यांना परत सन्मार्गावर आणणे गरजेचे आहे असे मला वाटले.’ श्रुतीचा असा प्रामाणिकपणा ‘कथा एका प्रत्यावर्तनाची’ या पुस्तकात ठिकठिकाणी दिसून येतो, अगदी तिने धर्म बदलताना, बदलल्यावर आणि पुन्हा हिंदू धर्मात परत आल्यावरही!
केरळ राज्यात कासरगोड जिल्ह्यातील मुळियार (कानत्तूर) या गावी शंकर भट्ट त्यांची पत्नी शारदाम्मा यांच्यासह राहत. त्यांची श्रुती नावाची मुलगी अत्यंत चौकस! तिला असंख्य प्रश्न पडायचे. जसे… महिला वेद, मंत्र म्हणू शकत नाहीत, हिंदू धर्मात जातीव्यवस्था का आहे?, हिंदू धर्माचे प्रशिक्षण का मिळत नाही? हिंदू लोक अनेक देव- देवतांची पूजा का करतात? देवाला कोणी प्रत्यक्ष बघू शकतो का? हिंदू धर्मात विविध विधी आणि प्रथा का? नैवेद्य न घेतल्यास देवी- देवतांचा कोप होतो का? अशी एक ना अनेक प्रश्न तिच्या मनात घोंघावत होती परंतु, अगदी बी.ए.च्या वर्गात गेल्यावरही ही प्रश्नं अनुत्तरित होती. लहानपणी असे प्रश्न जेव्हा श्रुती आईवडिलांना विचारायची तेव्हा तिच्यावर काही तरी परिणाम झाला आहे, कुणी तरी झपाटले आहे या विचाराने वडील तांत्रिक, मांत्रिक यांना बोलावून श्रुतीला काळा दोरा बांधून घ्यायचे. यावेळी अंता नावाच्या मांत्रिकाशी चर्चा करताना बाबा म्हणत, ‘सर्व धर्म सारखेच आहेत.’ परंतु प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असायची कारण सहावीला असताना श्रुतीला शिकविणाऱ्या लता नावाच्या शिक्षिकेच्या घरी तिने फराळ केला तेव्हा तिचे बाबा म्हणाले,’त्यांच्या घरी खाऊ नये कारण ते खालच्या जातीतील आहेत.’ हा विरोधाभास कुठेतरी श्रुतीच्या मनात खोलवर परिणाम करीत होता, कदाचित या दुटप्पी विचाराचा वेगळा परिणाम श्रुतीच्या भविष्यातील निर्णयाची नांदी ठरला…
प्राथमिक शिक्षण घेत असताना छोट्या मोठ्या घडामोडी घडल्या असल्या तरीही बी.ए. शिकत असताना वेगळ्या घटना घडत गेल्या. वर्गात मुस्लीम विद्यार्थीनीशी श्रुतीची जवळीक निर्माण झाली. त्या मुली फावल्या वेळात धार्मिक पुस्तके वाचत. श्रुतीने औत्सुक्याने इस्लाम धर्माबद्दल त्या मुलींना काही प्रश्न विचारले. त्यांचे धर्माविषयी ज्ञान पाहून ती अचंबित झाली आणि जेव्हा त्या मुलींनी त्यांच्या धर्माची विस्तृत माहिती सांगताना श्रुतीला हिंदू धर्माविषयी प्रश्न विचारले तेव्हा श्रुतीला उत्तरं देता आली नाहीत ती खजिल झाली. तेव्हा नकळत ती स्वतःची, स्वतःच्या धर्माची त्या मुलींशी आणि त्यांच्या धर्माशी मनोमन तुलना करु लागली. श्रुती ब्राह्मण कुटुंबातील असल्यामुळे ती शिवभक्त होती, परंतु शिवकथेच्या बाबतीत ती पूर्णतः अनभिज्ञ होती. तिने हिंदू मैत्रिणीकडून ‘शिवलिंग महात्म्य’ वाचायला घेतले परंतु त्यातील दंतकथा वाचून तिच्या मनात नकारात्मक भावना निर्माण झाली. श्रुती लिहिते, ‘गुगलवर हिंदू आणि इस्लाम या दोन्ही धर्मांविषयी शोध घेतला असता श्रुतीला इस्लाम धर्माची सर्व माहिती स्पष्ट व सोप्या भाषेत उपलब्ध सापडली. दुसरीकडे हिंदुत्वाबद्दल प्रत्येक साईटवर भिन्न नि परस्परविरोधी संकल्पना मांडलेल्या होत्या.त्यात काहीही सुसूत्रता नसल्यामुळे माझा गोंधळ आणखी वाढला.’
मनात गोंधळ वाढतो, असमंजस स्थिती निर्माण होते तेव्हा जे सोपे आणि स्पष्ट भासते तिकडे मानवाचा कल वाढत जातो. विशिष्ट बाबींविषयी द्वेष निर्माण होतो. श्रुतीचेही तसेच झाले. मनातील प्रश्नांचे घरातून आणि इतर माध्यमातून निराकरण होत नसताना त्याचवेळी एखादी सुस्पष्ट बाब पुढे आली की, तिचे आकर्षण वाढते.
पुढे श्रुती शिक्षिका असताना एक घटना घडली. ती शाळा मुस्लिम व्यवस्थापनाची होती, शाळेतील बहुतांश विद्यार्थी मुस्लिम होते. सहाव्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने श्रुतीने इस्लाम धर्म स्वीकारला तर लाख रुपये मिळवून देतो, अशी ऑफर दिली. सहाव्या वर्गातील विद्यार्थी परंतु, त्याची स्वधर्माबद्दलची तळमळ ही कुठेतरी श्रुतीच्या मनात मूक चाललेल्या द्वंदाला पोषक ठरली. शाळेतील सहकाऱ्यांसोबत तिची इस्लाम विषयक विविध विषयांवर चर्चा होऊ लागली. त्यांनी दिलेली पुस्तके वाचून, सीडीज ऐकून तिला भरपूर माहिती मिळाली. त्यातून इस्लाम धर्मच हा खरा धर्म आहे, इस्लामिक धर्मातील देव सर्वज्ञ आहे याबरोबरच कुराणासंबंधीची अनेक पुस्तके वाचून ‘स्त्रियांवरील अत्याचार आणि त्यांचे शोषण हे बहुसंख्य हिंदुत्वाच्या प्रभावामुळे होत आहे, हिंदू धर्मात स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोनच वाईट आहे.’ असा श्रुतीचा ठाम समज करवून देण्यात तिचे सहकारी यशस्वी झाले. हिंदू धर्मातील परंपरा कशा वाईट आहेत हे तिच्या मनावर वारंवार ठासून सांगू लागले. एकदा का कोणती गोष्ट मनाने विचारपूर्वक वा अविचाराने स्विकारली की ती पक्की बसते.
अशा असमंजस अवस्थेत असताना बऱ्याचवेळा एखादा गोष्टीबाबत दोन्ही बाजूंनी वैचारिक युद्ध सुरू होते. श्रुतीला दोन बाजूंशी झुंजावे लागत होते. एक बाजू इस्लामिक विचारांची होती तर दुसरी बाजू हिंदू धर्माची होती. लहानपणापासून मिळालेल्या हिंदू संस्कारांवर, बैठकीवर इस्लाम धर्म अतिक्रमण करीत होता. हळूहळू श्रुती नवीन शिकवणीच्या इतकी अधीन झाली की, ज्या शिवाची ती पूजा करीत होती त्याच शिवाला मंदिरात जाऊन वेडंवाकडं बोलू लागली, एकदा तर ती चक्क शिवाकडे पाहून थुंकली. इस्लामिक विचारांचा पगडा इतका परिणामकारक होता की, ती घरी नमाज पडू लागली.हिंदू धर्म आणि तो धर्म मानणाऱ्या लोकांना ती शत्रू समजू लागली. एवढेच नाही तर आई बाबांकडे बोट दाखवून, रोखून पाहताना घालून पाडून बोलू लागली. कदाचित तिची विकृत अवस्था झाली होती. एकदा तिला नमाज पडता आला नाही, आणि तिच्यासाठी खाण्याचा पदार्थ घेऊन आलेल्या आईमुळे अजान ऐकता आली नाही म्हणून तिने आईला झिडकारले आणि चक्क जन्मदात्या आईला थप्पड लगावली. श्रुती आईवडिलांना दुश्मन समजू लागली कारण ते इस्लाम विरोधक आणि हिंदुत्ववादी होते. श्रुतीने दररोज धिकर व सालाथ पाठ करताना कपाळाला कुंकू, बिंदी लावणे, देवाजवळ दिवा लावणे, हात जोडून प्रार्थना करणे हे सारे सोडून दिले. कारण ह्या गोष्टी आर.एस.एस.च्या लोकांसंबंधित आहेत असे तिच्या मनात बिंबविण्यात आले. तिच्या विचारात, आचरणात आमुलाग्र बदल झाला. ती पूर्णतः इस्लामिक झाल्याप्रमाणे वागू लागली. कुराणात असलेले नरकाचे वर्णन,अल्लाह सर्वशक्तीमान आहे हे सांगणारी वचने यामुळे तिची इस्लाम धर्मावर अढळ श्रद्धा बसली. शेवटी तिच्या मनाची तयारी इतकी धाडसी होती की, ती आईवडील, भाऊ, नातेवाईक ह्यांचा त्याग करून हिंदू धर्माला अव्हेरुन ‘केरळची मक्का’ अशी ओळख असलेल्या पोन्नानी येथील मौनतुल इस्लामिक सभा येथे पोहोचली. परंतु तिथली वागणूक पाहता ‘प्रथम ग्रासे मक्षिका पात’ असा तिला अनुभव आला परंतु तिचा निश्चय डळमळला नाही. ती ठाम राहिली. त्या संस्थेतील काही गोष्टी तिला नव्याने समजल्या, ज्या इस्लामचा अभ्यास करताना तिच्या समोर आल्या नव्हत्या. त्या संस्थेत श्रुतीसारख्या इतर धर्मातील अनेक महिला आलेल्या होत्या. तिला रहमत हे नाव मिळाले. मौनतुल मधील वातावरण पाहून अनेकदा रात्री तिला आईची आठवण येत असे परंतु लगेच ती निर्धाराने त्या आठवणी काढून टाकत असे. एका रात्री तिला झोपेत असताना परमेश्वराची एक मूर्ती दिसली, ज्या मूर्तीची ती लहानपणी पूजा करीत असे. ती खडबडून जागी झाली. स्वप्नात ती मूर्ती का आली? त्याचा अर्थ काय? या जाणिवेने ती गोंधळली परंतु निर्णयापासून तसुभरही ढळली नाही. जे हिंदू धर्माला, परमेश्वराला मानतात त्यांच्या दृष्टीने यामागे एक संकेत निश्चित असतो. भविष्यात घडणाऱ्या घटनांचा वेध असतो. परंतु, श्रुती या सर्वांच्या फार पुढे गेली होती.
श्रुती तिच्या इच्छित स्थळी पोहोचली. तिच्या घरची परिस्थिती अत्यंत शोकाकूल होती. अनेक ठिकाणी शोध घेतल्यानंतर तिच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांच्या शोध कार्यात श्रुतीच्या मोबाईलचा IMEI नंबर कामी आला. पोलिसांना तिच्या वास्तव्याचे ठिकाण समजले आणि पोलीस तिच्या आईवडिलांसह, काही हिंदू संघटनांचे प्रतिनिधींना घेऊन तिथे पोहचले. पोलिसांजवळ न्यायालयाचा आदेश होता त्यामुळे श्रुतीला घेऊन पोलीस गाडीत बसताच ‘बेटा’ असा हृदय फोडणारा टाहो तिच्या कानावर पडला. तिने मागे पाहिले. तिच्या बाबांचा तो आक्रोश होता…
श्रुतीला घेऊन दुसऱ्या दिवशी सारे कासरगोड येथील पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. तो दिवस विजया दशमीचा! काय होते नियतीच्या मनात? पोलीस स्टेशनमध्ये अनेकांनी तिचे मन वळवण्याचा प्रयत्न केला परंतु श्रुती ‘मला परत जायचे आहे’ यावर निश्चल होती. तिला न्यायालयासमोर उभे करण्यात आले. तिला विचारण्यात आले, “तुझा निर्णय काय?”
“मी आत्ता आई-वडिलांसोबत जाते. परंतु, दोन दिवसांनी मात्र इस्लामच्या अभ्यासासाठी पोन्नानीला परत जावे लागेल.”
जबाब देऊन बाहेर आल्यावर आईने प्रेमाने तिला मिठीत घेतले. तितक्यात तिचे लक्ष वडिलांकडे गेले. त्यांनी काहीतरी दूर फेकले होते. ती विषाची बाटली होती हे श्रुतीला समजताच तिला धक्का बसला. घरी येताच तिचे मन वळविण्यासाठी चर्चा, ज्योतिष्य, मांत्रिक हे प्रयोग झाले. गावाबाहेरच्या एका टेकडीवर नेऊन तिथे दहा-पंधरा ग्लास कडूलिंबाचा रस पाजण्यात आला. लगोलग श्रुतीला उलट्या सुरू झाल्या. तशा अवस्थेत श्रुतीला वाटले,
‘उलट्यांमुळे माझे पोट साफ होऊ शकेल, परंतु मी स्विकारलेला धर्म आणि श्रद्धेपासून मला कसे परावृत्त करता येईल?’ तशा अघोरी कृत्यामुळे श्रुतीच्या मनात हिंदुत्वाचा द्वेष, असहिष्णुता आणखी तीव्र झाली. तरीही तिने एक निर्णय घेतला, सर्वांशी गोडगोड बोलून, फसवून सुटका करून घेतली पाहिजे आणि मौनतुल संस्थेकडे जायला पाहिजे.
परंतु, चाणाक्ष वडिलांनी आणि इतरांनी श्रुतीला एर्नाकुलम येथील विश्व हिंदू परिषदेच्या समितीच्या कार्यालयात नेले. तिथे अनेकांनी तिचे समुपदेशन केले. दोन दिवसांनी तिथल्या लोकांच्या सल्ल्याने तिला त्रिप्पुणीत्तुरा येथील ‘शिवशक्ती योग विद्या केंद्रम्’ येथे नेण्यात आले. तिथे ‘आर्ष विद्या समाजम्’ पाटी होती. आत गेल्यावर तिला एका पूजा केंद्रात एक भव्य मूर्ती दिसली आणि श्रुती दचकली कारण इस्लामिक संस्थेत तिच्या स्वप्नात तीच मूर्ती आली होती. ते पाहून ती गोंधळली. परंतु, जसा त्यावेळी तो संकेत श्रुती ओळखू शकली नाही तसाच यावेळीही ती संकेत ओळखू शकली नाही कारण असे संकेत ओळखण्यासाठी व्यक्तिची तशी पात्रता असावी लागते.
आर्ष विद्या समाज केंद्रात तिची भेट आचार्य मनोजजी यांच्याशी झाली. त्यावेळी आचार्य माझे समुपदेशन करण्याऐवजी मीच जिहादीच्या भूमिकेतून त्यांचे मन वळवून त्यांना इस्लाम धर्मात घेऊन जाईल असा एक विश्वास श्रुतीला प्राप्त झाला. दोन परस्परविरोधी भूमिका असलेल्या व्यक्ती एकमेकांशी संवाद साधताना आपापल्या भूमिका स्पष्ट करणार होत्या. आचार्य मनोज यांचा केवळ हिंदू धर्मशास्त्राचा अभ्यास सखोल होता असे नाही तर इतर धर्मांचाही त्यांनी तितक्याच बारकाईने अभ्यास केला होता. दुसरीकडे श्रुती स्वतःची इस्लाम प्रचारकाची आणि सोबत हिंदू धर्म विरोधकाची भूमिकाही ठोसपणे मांडत होती. तिचा अभ्यास एकांगी वाटत असला तरीही तयारी पूर्ण होती, आत्मविश्वास होता. परंतु प्रत्येकवेळी चर्चा होताना श्रुतीचा आत्मविश्वास डळमळीत होत होता. परंतु ती तसे दाखवत नव्हती, तिचा अहंकार आडवा येत होता. तिचा प्रत्येक दावा आचार्य सप्रमाण आणि अभ्यासकाच्या दृष्टीने खोडून काढत होते. त्या चर्चेतून हिंदू, इस्लाम धर्माची चिकित्सा होऊ लागली. ती सारी चर्चा श्रुतीने आपल्या लेखनात वाचकांसाठी खुली केली आहे. ही चर्चा वाचताना वाचकाला विविध प्रकारची माहिती तर मिळतेच परंतु एक आत्मिक आनंद मिळतो. आचार्य मनोज आणि श्रुती यांची ज्या विषयांवर सुदृढ, अभ्यासपूर्ण आणि अशी चर्चा झाली. त्या विषयांचे शीर्षक आणि (त्या -त्या ग्रंथातील संदर्भ क्रमांक) वाचकांसाठी देत आहे…
‘अल्लाह, सर्वात दयाळू?, अल्लाची असहिष्णुता, कुराणातील संदेश, ज्यू व ख्रिश्चनांचा विरोध, ख्रिश्चन लोक श्रद्धाहीन, इतर देवांची निंदा/ तीव्र द्वेष, इतर सर्व देव नरकाचे इंधन, इतर देवांना प्रश्न करणार, अल्लाह अनेकेश्वरांना शिक्षा देणार, गैर मुस्लिमांची व्यभिचाऱ्यांशी तुलना,कुराणातील काही जिहादी संदेश वचने, विश्वास प्रणालीमध्ये परस्पर विरोधाभास, इस्लाम आणि स्त्रिया, कुराण किती वैज्ञानिक आहे, कुराणिक खगोलशास्त्र, अंधश्रद्धा: जिन्नवरील विश्वास, इस्लामिक न्यायशास्त्र, चुकीचा आहे, तर मग एवढा फोफावला कसा?, सनातन धर्माचा अभ्यास (सांगोपांग माहिती नि चर्चा)’ इत्यादी अनेक विषयांवर साधकबाधक, मनमोकळी चर्चा झाल्यानंतर, सर्व शंकांचे निरसन आणि स्वतःचे समाधान झाल्यानंतर श्रुतीने पुन्हा हिंदू धर्मात परत येण्याचा निश्चय केला. तिने आचार्य मनोज यांचे शिष्यत्व पत्करून प्रायश्चित्त म्हणून ‘आर्ष विद्या समाज’मध्ये पूर्ण वेळ सेविका म्हणून कार्य करण्याची इच्छा व्यक्त करताच आचार्य मनोज शांतपणे म्हणाले,
“मुली, आपल्या चुका मान्य करुन तू असा निर्णय घेत आहे याचा आनंदच आहे. परंतु प्रत्येक निर्णय खूप विचार करून घ्यायचा असतो. मी तुला आता या क्षणी कोणताच शब्द देत नाही. तू तरुण आहेस. जीवनात तुला इतर बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत ना? नोकरी, लग्न, पती, मूल, संसार इ. तुला पण ही स्वप्नं पडली असतीलच ना? या सर्वांचा त्याग करण्यास तयार असशील तर या क्षणी एकच वचन मी देऊ शकतो. इथे माझ्याबरोबर काम करणाऱ्या सर्वांचे मी आपला जीव गमावून पण रक्षण करणारच…”
शेवटी श्रुती आर्ष विद्या समाजमध्ये पूर्ण वेळ समाज सेविका म्हणून कार्य करू लागली… श्रुती स्वामी विवेकानंदांचे वाक्यं अभिमानाने सांगते, विवेकानंद म्हणतात, “या जगात जन्मलेल्या लोकांमध्ये मी सर्वात अभिमानी हिंदू आहे. जेव्हा जेव्हा हिंदू हा शब्द ऐकताक्षणी तुमच्या शरीरात विद्युतप्रवाह सळसळल्याची जाणीव होते तेव्हा तेव्हा तुम्ही खरे हिंदू होतात.”
श्रुती यांनी लिहिलेले स्वानुभव ए.आर.नायर आणि जे.ए. थेरगावकर यांनी मराठी भाषेत अनुवादित करून मराठी वाचकांना एक अनमोल भेट दिली आहे. या लेखनामागचा प्रमुख उद्देश जो तिने प्रतिपादन केला आहे, ‘माझे वाईट अनुभव इतरांच्या वाट्याला येऊ नयेत.’ श्रुती यांच्या या प्रामाणिक भूमिकेला शतशः शुभेच्छा! त्यांचा हेतू यशस्वी होवो अशा लक्ष लक्ष शुभेच्छा!
°°°°